राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा : रामदास आठवले

0

नागपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले आहे.

राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक टेकवतात. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा भारत उभा करायचा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याचे आठवले यांनी म्हटले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच आज काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 13-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here