रत्नागिरी : दुचाकी आडवी लावून एसटी बस चालकाला मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. प्रणय मधुकर नागवेकर (रा. विठ्ठल निवास चौसोपी वाडी, सिद्धेश्वर मंदिर जवळ, टेंबे- रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरातील एसटी बसस्थानकाच्या मागे असलेल्या साईमंदिरच्या सुमार घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनायक आत्माराम पवार (वय ४४, रा. पुष्पदत्त अपार्टमेंट-नाचणे गोडाऊन, रत्नागिरी) हे एसटी बस (एमएच-२०-डी-८८७२) घेऊन साईमंदिर येथे आले असता संशयिताने दुचाकी (एमएच-०८-एएच-४१४१) आडवी लावली होती. त्यामुळे बस चालक विनायक पवार यांनी बस जागीच थांबवली. मात्र नागवेकर याने एसटीच्या ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडून चालक पवार यांना मारहाण व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. शासकीय सेवा बजावत असणाऱ्या चालकाला सरकारी कामात अडथळा केला. या प्रकरणी पवार यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.
