Under 19WC- उपांत्य फेरीत हिंदुस्थान आणि पाकिस्तान आमनेसामने

0

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 चे पाच सामने होत आहे. काल हॅमिल्टन येथे झालेल्या चौथ्या टी-20 लढतीत टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला सुपर व्होवरमध्ये टीम इंडियाने पराभूत केले आहे. टीम इंडियानं हा टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध सलग चौथा विजय मिळवत मालिका जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडिया सध्या तुफान फोर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे हिंदुस्थानाचा अंडर-19 क्रिकेट संघही चांगली चमक दाखवत आहे. दक्षिण अफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर- 19 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या अंडर-19 क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा सामना परंपरांगत प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. दक्षिण अफ्रिकेत अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने उपांत्य स्पर्धेत धडक दिली आहे. या उपांत्य फेरीत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 4 फेब्रुवारी रोजी पोचेफस्ट्रुम येथे होणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मागील उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा 74 धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी 6 गडी बाद करुन अफगाणिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात अफगणिस्तान संघाने पाकिस्तानविरुद्ध 49.1 षटकात 189 धावा ठोकल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाज मोहम्मद हुरेराने 76 चेंडूत 64 धावा ठोकल्या. पाकिस्तान संघाने 41.1 षटकात चार गडी गमावून 190 धावा ठोकून अफगणिस्तान संघाला पराभूत केलं. या सामन्यासाठी फंलदाज मोहम्मद हुरेराला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here