रत्नागिरी शहरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

0

दोघांना करण्यात आली अटक

रत्नागिरी : बेकायदेशीररित्या इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविणाऱ्या टोळीचा मुंबई एटीएसच्या माहितीमुळे पर्दाफाश करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल शॉपी मालकासह पनवेल येथील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी गजाआड केेले आहे. दरम्यान, देशविरोधी कारवायांसाठी हे इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होते का? याबाबत मुंबई एटीएससह रत्नागिरी शहर पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉल होतात अशी माहिती मुंबई एटीएस ला मिळाली होती. ही माहिती रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली. यानंतर रत्नागिरी आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होेते. यासाठी एका कंपनीचे कनेक्शन घेण्यात आले होते. मुंबई एटीएसने माहिती काढलेल्या या इंटरनॅशनल कॉलिंगचा पर्दाफाश करताना धक्कादायक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. वाईप द्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मास्टर माईंड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम ४२०, ३४, आयटी ऍक्ट ४३(ह), ६६(ड), इंडियन टेलिग्राफीक ऍक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:03 PM 13-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here