जितेंद्र आव्हाड युवा मंचतर्फे चिपळुणात वैद्यकीय शिबिर

0

रत्नागिरी : महापुरामुळे चिपळुणात रोगराई पसरण्याचा धोका अधिक होता. याची दखल घेऊन जितेंद्र आव्हाड युवा मंच रत्नागिरी यांच्यावतीने व एसएमएस हॉस्पिटल चिपळूणच्या सहकार्याने पेठमाप येथे मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. चिपळूण शहर व परिसरात महापुराचं पाणी घुसले आणी संपूर्ण शहर उध्वस्त होऊन गेले. प्रचंड वित्तहानी व प्राणहानी होऊन महापूर शांत होत गेला. यानंतर मदतकार्य वेगाने होत होते. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला. यात अनेक सामाजिक संस्थांचे योगदान फार मोठे होते. प्रत्येकजण आपअपल्या परीने मदत करत होते. प्रशासनदेखील यात मागे नव्हते. याच दृष्टिकोनातून जितेंद्र आव्हाड युवा मंच, रत्नागिरीचे कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी झाले होते. जवळपास दोनशेहून अधिक लोकांना पुराच्या पाण्याने निर्माण होणारे आजार यावर टिटी इंजेक्शन व इतर औषधे जितेंद्र आव्हाड युवा मंच रत्नागिरी यांच्यावतीने मोफत देण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी पेडणेकर, एसएमएस हॉस्पिटलचे स्टाफ व डॉक्टर्स तसेच कार्याध्यक्ष शाहिद खेरटकर, उपाध्यक्ष फारुख मातारनाईक, शहराध्यक्ष रवींद्र अदावडे, तालुकाध्यक्ष सज्जाद काद्री व सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, स्थनिक नगरसेवक मनोज शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 14-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here