अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडे पाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:13 PM 14-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here