ब्रेकिंग: रत्नागिरी शहरातील सर्वोत्कृष्ट नगरसेवक कोण? : “यापैकी कोणीही नाही” सर्वात जास्त नागरिकांनी निवडला पर्याय

0

नागरिकांनी सर्वेतून व्यक्त केला नगरसेवकांच्या कामाप्रती असलेला प्रचंड असंतोष

दुसऱ्या क्रमांकावर सेनेचे निमेश नायर तर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांना

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट आणि विश्वासार्ह न्यूज नेटवर्क म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील सर्वोत्कृष्ट नगरसेवक कोण? हा प्रश्न रत्नागिरीतील नागरिकांना विचारण्यासाठी एक सर्वे घेण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत या सर्वेमध्ये नागरिकांना आपले मत नोंदवायचे होते. शहरातील १५ प्रभागातील २९ नगरसेवकांची नावे व “यापैकी कोणीही नाही” असे पर्याय नागरिकांना देण्यात आले होते. एका मेल आयडी वरून एकच मत नोंदवता येत होते. मागील अनेक वर्षांपासून रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून असे सर्वे घेण्यात येत आहेत व याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला आहे. आजच्या या सर्वेच्या निकालाकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागून होते. आज रात्री ८ वाजता या सर्वेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये एकूण १३,५८१ नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे.

“यापैकी कोणीही नाही” सर्वात जास्त नागरिकांनी निवडला पर्याय
या सर्वेमध्ये एक धक्कादायक गोष्ट पुढे आली असून याचा सर्वच नगरसेवकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या सर्वेमध्ये सर्वात जास्त नागरिकांनी म्हणजेच २०.१ % नागरिकांनी यापैकी कुणीही नाही असा पर्याय निवडला आहे. मागील चार वर्षात रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार अनेक वादात अडकलेला नागरिकांनी पहिला आहे. या सर्व कारभारात विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेवर देखील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. केवळ दिखाव्यासाठी नगरपालिकेच्या दालनात विरोध करून प्रत्यक्षात मात्र ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हाच कार्यक्रम नागरिकांनी अनेकवेळा अनुभवला आहे. जनता मूर्ख नाही, ती प्रत्येक गोष्टीची नोंद आपल्याकडे ठेवत असते व योग्य वेळी ती व्यक्त होत असते. याचाच प्रत्यय आजच्या सर्वेत दिसून येत आहे. सर्वाधिक नागरिकांनी “यापैकी कोणीही नाही” हा पर्याय निवडत या सर्वच नगरसेवकांच्या कामावर जणूकाही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दुसऱ्या क्रमांकावर सेनेचे निमेश नायर तर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांना
या सर्वेमध्ये सर्वच नगरसेवकांनी मतदानासाठी जोर लावला. आपल्या हितचिंतकांना व आपल्या प्रभागातील नागरिकांना मत नोंदवण्यास आवाहन करण्यात आले. आजच्या निकालानुसार दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच १५.४% मते निमेश नायर यांना पडली तर ७.९% मते मिळवून राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर तिसऱ्या स्थानावर राहिले.

टॉप १० नगरसेवकांची यादी व त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे
◾ “यापैकी कोणीही नाही” २०.१%
१) निमेश नायर, शिवसेना : १५.४%
२) सुदेश मयेकर, राष्ट्रवादी : ७.९%
३) सुहेल मुकादम, शिवसेना : ६.७%
४) स्मितल पावसकर, शिवसेना : ५.७%
५) समीर तिवरेकर, बीजेपी : ५.६%
६) शिल्पा सुर्वे, शिवसेना : ४.२%
७) अस्मिता चवंडे, शिवसेना : ४.१%
८) वैभवी खेडेकर, शिवसेना : ३.७%
९) संतोष कीर, शिवसेना : ३.६%
१०) विकास पाटील, अपक्ष : ३.६%

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
08:00 PM 15/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here