गोवंश हत्या प्रकरण : आरोपींना अटक करण्यात चिपळूण पोलिसांना यश

0

गेल्या महिन्यात चिपळुणातील कामथे आणि पिंपळी या ठिकाणी सलग दोन वेळा गोवंश हत्या झाली होती, या प्रकारामुळे चिपळूण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना मुंबई येथील मीरा रोड येथून चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. महमंद शाहिद सुलेमान कुरेशी (39 रा.जोगेश्वरी) आणि शहजाद मकसूद कुरेशी (रा.नालासोपारा) या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. हे आरोपी केवळ पैशांसाठी गुरांचे मांस मुंबईत नेऊन विकायचे अशी कबुली आरोपींनी दिली. ही एक आतंरराज्य टोळी असून त्यांनी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरसह गुजरात आणि दीव-दमण येथे असे गुन्हे केले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here