अफगाणिस्तानातील परिस्थितीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

0

मुंबई : अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. त्यापैकी, काही अफगानी नागरिक भारतातही आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथील घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्र सरकारला मोलाची सल्लाही त्यांनी दिलाय.

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत. त्यामुळे, आता आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. हुकूमशाहीने आलेल्या तालिबानींनी शांती राहावी, आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. लोकांना विश्वास द्यायचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आशा धरुयात की यात काही सत्यता असेल, असेही पवार यांनी म्हटले.

भारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे, आपल्या विदेशनितीचा आढावा घेण्याची वेळ आल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, हा संवेदनशील विषय असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. मात्र, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने सरकारला यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 16-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here