‘उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला…’

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत आणि पारिवारीक व्यक्ती आहेत. त्यांना आपल्या लोकांची काळजी असते, पण काही कारणास्तव त्यांनी धुक्यामध्ये दुसऱ्या कुणाचातरी हात पकडला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवारांना काही नेत्यांना एक गाणं डेडीकेट करणे आणि त्यांचा एक चांगला गुण सांगून त्यांना सल्ला द्यायला सांगितला. त्यावर मुनगंटीवार यांनी भन्नाट उत्तरे दिली.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटे
मुनगंटीवार म्हणाले की, ‘ पृथ्वीराज चव्हाण अतिशय प्रामाणीक आणि संयमी नेते आहेत. तसेच, यावेळी मुनगंटीवारांनी चव्हाणांसाठी ‘आदमी मुसाफीर है, आता है जाता है…झोका हवा का पानी का घेरा…फिर वो अकेला रेह जाता है…’, हे गाणं म्हणत पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमध्ये एकटे पडल्याची भावना बोलून दाखवली.

अजित पवार वक्तशिर नेते, पण…
पुढे मुनगंटीवारांना अजित पवारांविषयी विचारण्यात आले असता, ते म्हणाले की अजित पवारांचा वक्तशिरपणा आणि स्पष्टवक्तेपणा सर्वात चांगला आहे. इतर नेत्यांना हेवा वाटेल असा त्यांचा हा गुण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अजित पवारांमध्ये मीपणाची ऐट असल्याचे म्हणत, ‘आज जवानी(राजनिती)पर इतराने वाले कल तु पचतायेगा…चढता सूरज धिरे धिरे ढलता है, ढल जायेगा,’हे गाणं गायलं.

उद्धव ठाकरेंनी धुक्यात भलताच हात पकडला…
पुढे मुनगंटीवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे एक सुसंस्कृत आणि पारिवारीक राजकारणी आहेत. पण, त्यांनी अचानक आमची साथ सोडली आणि धुक्यात भलत्याच व्यक्तीचा हात पकडला. आता त्यांना तो हात सोडताही येत नाही, असे म्हटले. तसेच, ‘भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना…पुष्प नही बन सकते तुम काटे मत बनना…’हे गाण डेडीकेट केलं.

फडणवीस आक्रमक आणि अभ्यासू नेते
यावेळी सर्वात शेवटी मुनगंटीवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे आपले मत व्यक्त केले. फडणवीस हे अतिशय आक्रमक आणि अभ्यासू नेते असल्याचं ते म्हणाले. तसेच, ‘रूक जाना नही, तू कभी हार के, काटो पे चलके मिलेंगे साये बहार के…’, हे गाणं डेडीकेट केलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:00 PM 16/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here