“पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री,” असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना दिला आहे. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला होता. यावरून सामंत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधून त्यांचा समाचार घेतला आहे.
