भारतात कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण

0

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या कासरगोडेतील असलेला हा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच चीनच्या वुहानमधून भारतात परतला होता, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या हा रुग्ण वैद्यकीय देखरेखीत आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 350 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनहून केरळात आलेल्या एकूण 1,999 व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. कोरनाव्हायरसची लागण झालेल्या इतर 2 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळ सरकारने दिली आहे. चीनमध्ये असलेल्या एकूण 647 भारतीयांना भारतात आणण्यात आलं आहे, त्यांनाही हरयाणातल्या मानेसरमध्ये विशेष मेडिकल कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here