दापोली : भाजपचे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे दि. १७ रोजी दापोली मुरुड येथे येणार असून मुरुड येथे बांधलेले बेकायदेशीर बंगलो तसेच रिसॉर्ट तोडण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दापोली तालक्यातील मुरुड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र, याच पर्यटनस्थळी बेकायदेशीर बंगलो, रिसॉर्ट अशी बांधकामे झाली असून या बेकायदेशीर बांधकामांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या बाबत किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला आहे. ही बेकायदेशीर बांधकामे मंत्री आणि राजकीय लोकांची आहेत असा, आरोप सोमय्या यांनी केला आहे. या आधी तीनवेळा सोमय्या हे दापोलीत येऊन गेले आहेत आणि ही बेकायदेशीर बांधकामे तोडण्यात यावी म्हणून त्यांनी केंद्राकडे देखील पाठपुरावा सुरु केला आहे. दापोली मुरुड येथे दोनवेळा केंद्रीय समिती यांनी येऊन बेकायदेशीर बंगला तसेच रिसॉर्ट यांची पाहाणी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 17-Aug-21