देवरुख: सावरकर आणि अनंत गद्रे यांच्या भेटीचा इतिहास साकारणार…

0

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळा मार्फत सदानंद भागवत यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. सावरकरांच्या जीवनातील प्रमुख क्षण कॅनव्हासवर रेखाटले जाऊ लागले आहेत. यातील दुसरे चित्र तयार झाले आहे. देवरुखचे अनंत हरी उर्फ समतानंद गद्रे व सावरकर यांच्या भेटीचे चित्र कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांनी तयार केले आहे. देवरुखचे अनंत हरी गद्रे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. या काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची त्यांनी भेट घेतली होती. रत्नागिरीच्या पतित पावन मंदिरात समतानंद गद्रे उपस्थित होते. समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात समतानंद व सावरकर एकत्र आले होते असे छायाचित्र प्रसिद्घ आहे. याच छायाचित्रावरून हे चित्र सदानंद भागवत यांनी स्मृतिमंदिरासाठी निवडले आहे. देवरुख न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांनी ते कॅनव्हासवर हुबेहूब चितारले आहे. अनंत हरी उर्फ समतानंद गद्रे हे देवरुखचे. नाटककार, जाहिरातकार, वृत्तपत्रकार, समाजसेवक अशी त्यांची चतुरस्त्र ओळख आहे. हाउसफुल्ल या व अशा अनेक शब्दांचे ते जनक आहेत. लोकमान्य टिळकांबरोबर त्यांनी ‘संदेश’ दैनिकासाठी टिळकांच्या सोबत राहून चार वर्ष दौर्‍यातील वृत्तांत समतानंदानी छापला होता. अस्पृश्यता निवारणासाठी 1935 ते 1940 दरम्यान संत गाडगेबाबांच्या प्रभावाने देवरुख येथे समतानंद गद्रे यांनी सत्यनारायणाची पूजा घातली व या पूजेसाठी हरिजन जोडपे बसवले व प्रसाद म्हणून झुणका भाकर वाटली. असे 101 सत्यनारायण त्यांनी विविध ठिकाणी घातले. लवकरच चित्र रुपाने हा इतिहास सर्वांसमोर नव्याने येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here