चालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टळला

0

राजापूर : राजापूर ओणी-कळसवली चुनाकोळवण मार्गावर जीओ या खासगी मोबाईल कंपनीकडून केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाच्या प्रवाशांसह वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याच्या खोदकामामुळे भर पावसात माती व चिखल रस्त्यावर आल्याने राजापूर गितयेवाडी या प्रवासी आणि शालेय विद्याथ्यांनी भरलेल्या एस.टी, बसला अपघात झाला आहे. या चिखल व मातीत ही एस.टी. बस अडकली व घसरली. सुदैवाने एस.डी.चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटीबस सावरल्याने गंभीर अपघात टळला आहे. जीओ कंपनीच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या बेजबाबदार पणाविरोधात या परिसरातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार आहे की नाही असाही सवाल उपस्थित केला जात आहे. राजापूर ओणीतून पुढे आत जाणान्या कळसवली, वडवली चुनाकोळवण मार्गावर जीओ कंपनीकडून केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले जात आहे. बांधकाम विभागाने यासाठी संमती दिली आहे. मात्र हे खोदकाम करताना संबंधीत कंपनीकडून कोणतेही नियम पाळले जात नाहीत, कशाही प्रकारे रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाच्या वाहनांना याचा मोठा त्रास होत आहे. सोमवारी सकाळी राजापूर आगाराची राजापूर गितयेवाड़ी ही बस प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना मुसळधार पावसात कंपनीन खोदकाम केलेली माती रस्त्यावर आल्याने निर्माण झालेल्या चिखलात अडकली व घसरू लागली. वडवली नजीक ही बस पूर्णपणे या माती आणि चिखलात अडकली. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटीबस सावरल्याने गंभीर अपघात टळला आहे. या अपघातानंतर प्रवासी व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पायपीट करतच शाळेत जावे लागले. अशा प्रकारे गंभीर अपघात होऊन जीव गेल्यावर त्यांना जाग येणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here