खडपोली येथे हातभट्टीवर धाड; गावठी दारूसह दीड लाखांचा ऐवज जप्त

0

चिपळूण : तालुक्यातील खडपोली येथे एका हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून दीड लाखाचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये टाटा मॅजिक गाडीचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत नाईक यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खडपोली येथे ही घटना उघडकीस आली. टाटा मॅजिक गाडीतून बेकायदेशिरपणे दारूची वाहतूक करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये ७,३५० रुपये व १४० रुपयांची हातभट्टीची दारू, दीड लाख रूपये किमतीची टाटा मॅजिक गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अल्पेश अंकुश पवार, पांडुरंग बाळू कदम, सुरेश ऊर्फ बाबू हरिचंद्र निकम (रा. तिवरे) यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवरही याआधी देखील अशाप्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 17-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here