दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे-नातुंडे येथे पूर्ववैमनस्यातून आपल्यालाच बोलत असल्याच्या गैरसमाजातून शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करत कोयतीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकाच घरातील चार जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार १३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. घडली. दिगंबर पाटील, प्रणाम पाटील, दीपिका पाटील आणि पूजा पाटील (सर्व रा. मावळंगे नातुंडे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात राजन शांताराम पवार (३२, रा. मावळंगे नातुंडे, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्या नुसार पवार आणि पाटील हे एकमेकांचे शेजारी आहे. त्यांच्यात पूर्वीपासून काही कारणातून वाद आहेत. यातूनच शुक्रवारी रात्री राजन पवार हे आपल्या पत्नीशी घरात बोलत असताना ते आपल्याबाबतच बोलत असल्याचा पाटील कुटुंबीयांचा गैरसमज झाला. तेव्हा दिगंबर पाटील याने कोयती घेऊन व अन्य तिघांनी पवार दाम्पत्यांस शिविगाळ व दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पो. उपनिरीक्षक कांबळी करत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 17-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here