राणीबागेतील उद्यान प्रदर्शनाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रदर्शनाची तारीख वाढवली

0

राणीबागेत भरलेल्या वार्षिक झाडे, फुले, फळे, भाज्यांच्या प्रदर्शन आणि उद्यानविषयक कार्यशाळेला मुंबईकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी भेट दिली आहे. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांच्या हस्ते उत्कृष्ट ठरलेल्या संस्थांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रदर्शनाची तारीख महापौरांनी 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. मुंबई महानगरपालिका उद्यान खाते व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 25व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्याविषयक कार्यशाळेत मुंबईकरांनी गर्दी केली. प्रदर्शन आणि उद्यानविद्याविषयक कार्यशाळेचा बक्षिस वितरण समारंभ उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी नगरसेविका कमरजहॉ सिद्दीकी, परीक्षक हनुमंत राजे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य अब्बासी, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी या मान्यवरांसह रहिवासी उपस्थित होते. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्था व प्राधिकरणाच्या स्पर्धेत गोदरेज ऍड बॉईजला प्रथम पारितोषिक व मध्य रेल्वेला द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना उपमहापौर ऍड. सुहास वाडकर व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here