दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेतूनही बाहेर

0

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यावेळी फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने तो रिटार्यड हर्ट झाला होता. त्याने नाबाद 60 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा धक्का बसणार आहे. भारताच्या आघाडीच्या फळीची मदार त्याच्यावर होती. आता त्याच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची असा प्रश्न टीम इंडियासमोर असेल. न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. त्यात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं केएल राहुलने सांगितलं होतं. त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित खेळू शकणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here