रत्नागिरी : शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारअंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक),राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१८-१९ या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज सादर करावेत. ऑफलाईन अर्ज करणाऱ्यांनी आपला अर्ज जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत सादर करावा. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे संपर्क साधावा.
