रत्नागिरीतील इंटरनॅशनल कॉलिंग प्रकरणी ‘त्या’ दोघांच्या कोठडीत वाढ

0

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील येथील श्री मोबाईल अॅन्ड टेककॉम या दुकानात सीप ट्रॅकिंग सिस्टम बसवून इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवणाऱ्या दोन संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. अलंकार अरविंद विचारे (३८, रा. छत्रपती नगर रत्नागिरी) आणि फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या बाबत रत्नागिरी पोलिसांना मुंबई एटीएसकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत या दोघांनाही अटक केली होती. त्यांना १४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी या कोठडीची मुदत संपल्यामुळे संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालाने त्यांची पुन्हा २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, संशयितांच्या अन्य सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:50 AM 18-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here