पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला ऑलिम्पिकपटूंच्या स्वाक्षरीचा ‘गमछा’

0

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. नीरज चोप्रानं भालाफेकीत सुवर्ण जिंकून इतिहास घडवला, तर वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यक्रांती घडवली. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्टपदक जिंकले. ४१ वर्षांनंतर हॉकीत भारतानं ऑलिम्पिक पदक जिंकेल, तर सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. पदक जिंकलेल्या खेळाडूंचं कौतुक केलंच, शिवाय त्यांनी पदकाने हुलकावणी दिलेल्या खेळाडूंना मनोबल उंचावणारा कानमंत्र दिला. हा सर्व सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर मोदींचा एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. मोदींनी घातलेला गमछा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. मोदींनी घातलेल्या या गमछावर ऑलिम्पिकपटूंची स्वाक्षरी आहे आणि त्यांच्या या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 18-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here