मुख्य जिल्हा न्यायाधीश जोशी यांची मुंबई धर्मादाय आयुक्तपदी निवड

0

रत्नागिरीतील मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी यांची बदली होऊन मुंबई धर्मादाय आयुक्तपदी त्यांची निवड झाली. मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून रत्नागिरीत रुजू झाल्यानंतर जोशी यांनी न्यायालयांच्या इमारतींची अपुरी कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम, नगर परिषद व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा केला. ते स्वतः या सर्व कामांची पाहणी करून आवश्यक असणारे बदल संबंधित अधिकाऱ्यांना सुचवत होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here