भारत वि. इंग्लंड : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघात बदल; दिग्गज संघाबाहेर

0

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं आपला संघ जाहीर केला आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघानं जॅक क्रॉली आणि डॉम सिबली यांना संघात स्थान दिलेलं नाही. याशिवाय फलंदाज डेव्हिड मलानला तीन वर्षांनंतर कसोटी संघात स्थान मिळालं आहे. त्यानं शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये एजबॅस्टन येथे खेळला. याशिवाय तिसऱ्या कसोटी समान्यासाठी या संघात वेगवान गोलंदाज साकिब महमूदचाही सहभाग असेल. साकिब प्रथमच भारताविरुद्ध या संघातून कसोटी सामन्यात प्रवेश करणार आहे.

इंगलंडच्या टीममधील बरेच क्रिकेटपटू पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाले. पहिल्या सामन्यात मार्क वूड याला दुखापत झाल्यानं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. एमराल्ड हेडिंग्ले या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापूर्वी पूर्णपणे ठीक होतील, अशी अपेक्षा आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले की, “कसोटी सामना खेळण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे तयार आहे आणि पुढील आठवड्यात एमराल्ड हेडिंग्लेमध्ये मैदानात परतण्याचं आमचं लक्ष्य आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आशा आहे की, पहिल्या कसोटीत मार्क वुड त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर ठीक होऊन सामान्य खेळण्यासाठी तयार होतील.”

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रॅग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वुड यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाची कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडी

टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. पुढील कसोटी सामने जिंकून आपली पकड मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहोम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 19-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here