खेड : खेड पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारीपदी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील पंचायत समितीत सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुशांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेडचे गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी दि. ३१ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर हे पद रिक्त होते. चिपळूण येथील सहायक गटविकास अधिकारी पी. एस. भोसले यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. अखेर पाटील यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून दि. १५ ऑगस्ट रोजी पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 19-Aug-21