लोटे येथे गांजा बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक

0

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका बंद कारखान्याच्या बाहेर १८ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गांजा बाळगल्याप्रकरणी पाच जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश रमेश माने (वय २४, तलारीवाडी, गुणदे, खेड), सुरज लक्ष्मण वरक (२०, तलारीवाडी, लोटे, खेड), अमान हुसेन सौतिरकर (२०, गवळीवाडी, घाणेखुंट, खेड), विजय मारुती लोहार (१९, लोटे माळ, खेड) व मुस्तफा इस्तियाक शहा (१८, गवळीवाडी, घाणेखंट, खेड) यांना दि.१८ रोजी पहाटे १.३५ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीत मोरॅक्स कंपनीच्या बाहेर २१५ ग्रॅमच्या सुमारे ३२२५ रुपये किमतीच्या गांज्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांपैकी राकेश माने हा सराईत गुन्हेगार असून, या पूर्वीही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पाचही संशयितांविरोधात पोलिसांनी अमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कायद्यातील कलम ८(क),२०(ब (२) व कलम २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 19-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here