फळ बाजारात रत्नागिरी हापूसची आंब्याची एक पेटी बाजारात दाखल झाली. पाच डझनाच्या या एका पेटीस बोली लावून घाऊक बाजारात 21 हजार 500 रुपये भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन करण्यात आले. यावेळी फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, अडते असोसिएशनेचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, प्रताप निकम, रामदास गायकवाड, भरत परदेशी, संजय वखारे, तात्या कोंडे, राजू ओसवाल, राजू पतंगे, आण्णा हराळे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, राजू सुर्यवंशी, अनिरूध्द भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, अजिंक्य कांचन, बलभीम माजलगावे, यांच्यासह अन्य व्यापारी आणि बाजार घटकातील व्यक्ती उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील टेंभे गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून ही आवक झाली.
