परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाकडून दुसऱ्यांदा दंड

0

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची समांतर चौकशी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल समिती करत आहे. परमबीर सिंह यांना आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊनही अद्याप त्यांनी ते सादर केलेले नाही. या आधी जून महिन्यातही आयोगाने परमबीर यांना पाच हजारांचा दंड ठोठावला होता. आयोगाची पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. दंडाची ही सर्व रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. यात देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा उल्लेख यात केला आहे. या प्रकरणानंतर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेची दखल घेत सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र दुसरीकडे या आरोपांची समांतर चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगांतर्गत सुरू आहे. चांदीवाल यांनी ३० मे रोजी पाच जणांना समन्स बजावत या आरोपांच्या अनुषंगाने ११ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. जे अद्याप त्यांनी सादर केलेले नाही.

या संदर्भात परमबीर सिंह यांनी ५ जुलै रोजी चौकशी समितीच्या रजिस्ट्रीकडे अर्ज सादर करत या चौकशीला गैरहजर राहण्याची विनंती केली गेली होती. मात्र ३० जुलै रोजी आयोगाने परमबीर सिंह यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांना ६ ऑगस्टला आयोगासमोर उलट तपासणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्णयाला परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपण लिहिलेल्या पत्रावरूनच उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत मग आता वेगळ्या चौकशीची गरजच काय? असा प्रश्न परमबीर सिंह यांनी याचिकेतून उपस्थित केला. आपल्या पत्रातील मजकुरामध्ये तपास करण्यायोग्य काही आढळल्यास तपासयंत्रणेकडून स्वतंत्र तपास करण्यात यावा हाच मूळ हेतू ही चौकशी समिती नेमण्यामागे होता. मात्र सीबीआयने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे आता चांदीवाल समितीमार्फत स्वतंत्र चौकशीची शिफारस ही निरर्थक आहे, असा दावाही परमबीर यांनी याचिकेतून केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 20-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here