स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या अभूतपूर्व प्रतिसादावर अॅड. पटवर्धन म्हणतात…

0

रत्नागिरी: आर्थिक शिस्त आणि जपलेली विश्वासार्हता यामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे ठेवीदारांचा ओघ कायम आहे, असे मत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सहा कोटी ६१ लाखांच्या ठेवी सुमारे ४७५ खातेदारांनी विविध शाखांमध्ये गुंतवल्या. ते म्हणाले, स्वरूपानंद पतसंस्थेने राखलेली आर्थिक शिस्त व विश्वासार्हता याचबरोबर ग्राहकांशी प्रस्थापित केलेले सौहार्दपूर्ण संबंध या बळावर गुंतवणूकदाराला स्वरूपानंद पतसंस्था आपलीशी वाटते. ग्राहकांबरोबर एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. विश्वासार्ह सेवेमुळे हा ऋणानुबंध अधिकाधिक दृढ होत, विस्तारत आहे. याचीच प्रचीती प्रत्येक वेळी घोषित झालेल्या ठेवयोजनांना मिळत असलेल्या प्रतिसादाच्या माध्यमातून येते. एकूण अर्थकारण मंदावले आहे. अस्थिर आर्थिक वातावरण आहे. अशा वातावरणात नेटक्या ध्येयधोरणानुसार आणि कमालीची आर्थिक शिस्त राखत स्वरूपानंद पतसंस्था आपले व्यवहार करत असल्यामुळे असलेल्या व्यावसायिक संधी टिपत त्या माध्यमातून चांगला व्यवसाय पतसंस्था करत असते. यामुळे स्वाभाविकपणे संस्थेची आर्थिक ताकद सतत वृद्धिंगत होत असते, हे आकडेवारी पाहता स्पष्ट होते. हीच बाब ठेवीदारांना संस्थेत गुंतवणूक करण्यास आश्वस्त करते. स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवी दोनशे कोटीच्या समीप पोहोचल्या असून नववर्ष स्वागत योजनेच्या माध्यमातून सहा कोटी ६१ लाखाची नवीन ठेव संस्थेत गुंतवली गेली. त्यामुळे संस्थेच्या ठेवी आता शंभर कोटी 96 लाखापल्याड पोहोचल्या आहेत. म्हणजेच ३१ मार्चपूर्वी संस्था २०० कोटींचा ठेव टप्पा नक्की पूर्ण करेल, असा विश्वास अॅ्ड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. ठेवीदारांनी दाखवलेला विश्वाीस प्राणपणाने जपत अर्थजगतातील नवनवीन शिखरे पादाक्रांत करू, असे सांगत सर्व ठेवीदारांचे अॅड. पटवर्धन यांनी आभार मानले. अर्थकारण करताना आर्थिक समीकरणे, अर्थकारणाच्या भविष्यातील वाटचालीला अंदाज, आकडेवारीचा तौलनिक अभ्यास, कर्ज मागणी आणि ठेव उभारणी याचा ताळमेळ व योग्य कर्जदाराची निवड, कर्जदारांना किफायतशीर कर्जपुरवठा आणि या सर्वांचे व्यवस्थापन, समन्वय यामधून उत्तम आर्थिक संस्था उभी राहते, हे स्वरूपानंद पतसंस्थेने सिद्ध केल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here