“सध्या मी दिवसातून एकदाच जेवतो”; पंतप्रधान मोदींनीच केला यामागील खुलासा

0

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आमंत्रित केले होते. यानंतर सोमवारी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खेळाडूंशी आवड लक्षात घेऊन त्यानुसार खाण्याचा मेन्यू ठरवण्यात आला होता. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आताच्या घडीला दिवसातून एकदाच जेवत असल्याची बाब समोर आली. पंतप्रधान मोदी एकभुक्त का राहतात, याचा खुलासा खुद्द पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. 

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासाठी त्याचा आवडता पदार्थ म्हणजेच चूरमा मेन्यूमध्ये ठेवला होता. नीरजने, तुम्हालाही माझ्यासोबत चूरमा खावा लागेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींना चूरमा खाण्यासाठी आग्रह केला. मात्र, त्यावेळी मोदींनी नीरजला नकार दिला. सध्या चातुर्मास सुरु असून, या कालावधीमध्ये मी दिवसातून एकदाच जेवतो, असे मोदींनी नीरजला सांगितले.

पंतप्रधान मोदी चातुर्मासासोबतच नवरात्रीच्या कालावधीमध्येही उपवास करतात. नवरात्रीमध्ये पंतप्रधान मोदी निवडक पदार्थांना आपल्या आहारामध्ये स्थान देतात. नरेंद्र मोदी हे गेल्या ३२ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवास करतात. याशिवाय, दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. चातुर्मासाच्या कालावधीत शरीरामधील दाहकता वाढवणाऱ्या, पित्त वाढवणाऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. अनेकजण पावसाळी वातावरण आणि सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन दिवसातून एकच वेळ जेवण घेतात. पंतप्रधान मोदीही चातुर्मासात एकाच वेळेचे जेवण करतात. मोदींनी नीरजला हे सांगतानाची दृष्य कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:26 PM 20-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here