खेडच्या प्रशांत सावंत यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

0

खेड : येथील दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत यांची दि. २४ ते २६ ऑगस्ट रोजी मालदीव येथे होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. प्रशांत सावंत यांनी गेली दहा वर्षे दिव्यांग खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळविली आहेत. प्रशांत सावंत यांच्या रूपाने जिल्ह्यातील पहिलाच दिव्यांग खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रशांत सावंत यांच्या भारतीय संघात झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव सुहास मोरे, अतुल धनवडे, सुनील शिंदे, नारायण मडके, अनिल भेकरे, सचिन खेडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 20-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here