प्रकाशमान आंगणेवाडीसाठी हायमास्ट टॉवरची उभारणी

0

मालवणातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या तयारीसाठी आंगणेवाडी मंडळासोबत शासन यंत्रणाही सज्ज झाले आहे. आंगणेवाडी परिसर अधिक प्रकाशमान व्हावा, यासाठी नव्याने दोन हायमास्ट टॉवर मंजूर करण्यात आले असून त्यांची उभारणी सुरू झाली आहे. आंगणेवाडीत मोबाईल रेंजची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. याचा विचार करता असलेल्या टॉवरची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच येथील शाळांमध्ये सुसज्ज शौचालय उभारण्यात येणार आहेत. त्याचा वापर यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील आठवड्यात कणकवली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत सुचवलेली अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here