मासेमारी सुरू झाल्यामुळे हर्णे बंदर गजबजले

0

दापोली : वादळ आणि पावसाळी वातावरणामुळे यावर्षी मासेमारीचा मुहूर्त लांबला होता. वादळी वातावरण निवळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मच्छीमारांनी समुद्राचा अंदाज घेऊन दोन दिवसांपासून मासेमारीला सुरुवात केल्याने पुन्हा हर्णे बंदर गजबजले आहे. हर्णे बंदर हे मासळी खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर आहे. सुमारे ९०० नौका या बंदरात मासेमारी करतात. त्यामुळे येथे रोजच मोठा मासळी लिलाव भरतो. जून, जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी असल्यामुळे हर्णे बंदरात शुकशुकाट होता. मात्र आता मासेमारीला सुरुवात झाल्याने हर्णे बंदर गजबजले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 21-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here