सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्र्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली यावर बाप बाप होता है, असा टोला शिवसेना नेते सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे. सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाकून नमस्कार करतानाचा फोटो ट्विटरवर शेअर करत बाप बाप होता है, असं कॅप्शन दिलं. अहिरांनी आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलारांना टॅग केलं आहे. मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असं स्पष्टीकरण भाजप नेते आशिष शेलार यांनी काल दिलं.
