औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे राज्यातच जातीचं राजकारणात वाढ झाल्याचं केलेलं वक्तव्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात जातीवाद वाढला आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं आहे, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 21-Aug-21