निमेश नायर जबाबदारीने भटक्या गुरांना आसरा देण्यासाठी करतायत काम…

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये गेले काही दिवस मोकाट गुरे फिरत आहेत. बिचारी ही मूकी जनावरे आसरा आणि खाणे मिळवण्यासाठी फिरत असतात. शहरातल्या रहदारीमध्ये फिरताना या मुक्या प्राण्याला माणसासारखं समजत नसल्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. आता शहरात फिरतात म्हणजे पालकत्व रत्नागिरी नगर परिषदेकडे आलं. आता या मुक्या प्राण्यांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेऊन तिथे त्यांना चारा, पाणी, तिकडची स्वच्छता करण्याची जबाबदारी मनापासून एक माणूस म्हणून उचलली आहे ती निमेश नायर यांनी. अर्थात ते एक जबाबदार नगरसेवक तसेच स्वच्छता आणि आरोग्य सभापती आहेतच. आपल्या कर्तव्याबरोबर एक माणूस म्हणून गेले 2 दिवस ते अहोरात्र आपल्या सहकाऱ्यांसोबत या जनावरांच्या पाठून फिरत आहेत. गेल्या 2 दिवासामध्ये त्यांनी 63 भटक्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात आणलं आहे. तिथे चारा, पाणी, स्वछता सगळी व्यवस्था करून त्याची दखल घेत आहेत. अजूनही 20 ते 25 भटकी जनावर मोकळी फिरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे लवकरच ही फिरणारी मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात आणली जातील. एक जबाबदार नगरसेवक म्हणून काम करत असताना एक माणूस म्हणूनही या मुक्या प्राण्याला त्यांच्या रूपाने आधार मिळाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:43 PM 22-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here