गणेशभक्तांसाठी खुशखबर! रत्नागिरीत दाखल होणार ५० नवीन लालपरी

0

रत्नागिरी : रत्नागिरी एस.टी विभागाच्या ताफ्यात नव्याने ५० लालपरी दाखल होणार असून, यामुळे गणेशभक्तांना चांगला दिलासा मिळाला आहे. या ५० गाड्यांचे शेड्युल तयार करून महामंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. यामधील ५० गाड्या या रत्नागिरी एस.टी विभागासाठी देण्यात येणार आहेत. मुळात रत्नागिरीत ६८० गाड्या कार्यान्वित आहेत. यात आता पुन्हा ५० गाड्यांची भर पडणार असल्याचे सुनील भोकरे यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी जिल्हयात दाखल होत असतात. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन गाड्या दाखल होणार असल्याने मोठा दिलासा चाकरमान्यांना मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, रत्नागिरीत याबाबत कोणतीही माहिती नाही, हा महामंडळ स्तरावरचा निर्णय असल्याचे विभाग नियंत्रक भोकरे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 23-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here