रत्नागिरी: राष्ट्रसेविका समिती लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने आज (दि. ५ फेब्रुवारी) रत्नागिरीत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आज सायंकाळी ४ वाजता टिळक आळीतील लोकमान्य जन्मस्थानापासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी या शोभायात्रेचा प्रारंभ लोकमान्यांना आदरांजली वाहून करतील. टिळक आळी, राम मंदिर, गोखले नाका मार्गाने स्वा. लक्ष्मी चौक अशा मुख्य रस्त्यावरून ही शोभायात्रा मार्गस्थ होईल. शोभायात्रेत घोषवाक्य, मंगलकलशधारी महिला, विद्यार्थी, संचलन, भजनी मंडळ, नागरिक आणि मान्यवरांची विविध पथके सहभागी होतील.
