रत्नागिरीच्या विद्यार्थिनीकडून कळसूबाई शिखर सर

0

रत्नागिरी : येथील वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी श्रीनाथ हिने कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकावला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवरील हे शिखर वैष्णवीने पादाक्रांत केले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील बारी गावात कळसूबाई शिखर आहे. संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी, चिखलमय पाऊलवाट, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, हुडहुडी भरवणारी थंडी, सोसाट्याचा वारा, वन्यजीव अभयारण्ये या आव्हानांवर वैष्णवीने मात केली. सर्व आव्हानांना सामोरे जात वैष्णवीने शिखर सर केले. तिच्यासह नाशिक येथील अमोल तेलंग, विलास बोडके, गोपाळ वडवले, डॉ. समीर भिसे या सर्व गिर्यारोहकांनी शिखरावर तिरंगा फडकावला. ऑलिंपिक विजेते खेळाडू, एनडीआरएफ जवानांच्या कार्याला सलाम करून वैष्णवीने आपला विजय भारतीय संरक्षण दलाला समर्पित केला. वैष्णवीने यापूर्वी प्रबळगड, हरिहरगड, रायगडवर चढाई करून सह्याद्रीच्या खोर्या तील अतिकठीण सुळके सर केले आहेत. मनाली (उत्तराखंड) येथील बेसिक माऊंटेनिअरिंगचे प्रशिक्षण पूर्ण करताना अ श्रेणी मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे. वैष्णवीच्या तिच्या साहसी मोहिमांना तिचे वडील दत्ताराम मारुती श्रीनाथ पाठिंबा देतात. आकाश प्रमोद पालकर यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:33 PM 23-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here