ब्रेकिंग: नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची मालिका

0

रत्नागिरीतील शिवसैनिक पोलिसात तक्रार करण्याच्या तयारीत

चिपळूण : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने चांगलाच इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी अनुद्गार काढले होते. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवर नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यातही शिवसेना आमदार अंबादास दानवे नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यातील आणखी काही शहरांमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करुन शिवसैनिकांकडून त्यांची कोंडी केली जाऊ शकते. आता रत्नागिरीत देखील तक्रार करण्यासंदर्भात शिवसैनिकांनी हालचाल सुरु केल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:56 AM 24/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here