“खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर…” निलेश राणेंचे शिवसेनेला थेट आव्हान

0

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निघालेल्या अटकेच्या आदेशांनंतर राणे समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. एकीकडे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी युवासेनेला डिवचल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यास भाजपामधील राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी यासंर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, कुठेतरी बॅनर लावून आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ, असे थेट आव्हान निलेश राणे यांनी दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:21 AM 24/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here