राज्यात मध्यावधी निवडणुका होणार; चंद्रकांत पाटलांचे भाकीत

0

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटणे बाकी असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले आहे. राज्यात नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे स्पष्ट होईल अशा भाषेत चंद्रकांत पाटील यांनी आपला अंदाज व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ‘ भाजपाने विश्वासघात केल्याचे’ म्हटले होते. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ‘कोणी कोणाचा विश्वासघात केला. हे जनता ठरवेल’. मात्र, याचवेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकांचीही शक्यता वर्तवली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘लोकांना माहिती आहे कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे लोक ठरवतील.”

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here