शिवसेनेकडून ‘कोंबडी चोर’चं पोस्टर; आता उद्धव ठाकरेंना नितेश राणेंचं प्रत्युत्तर…

0

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेनं नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकलं आहे. शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे. यामध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला आहे. तसंच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:13 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here