नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्ते-युवासैनिकांमध्ये तुफान राडा

0

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पुणे, नाशिक, महाड आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

तर यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे. तर यातच नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला सिंहाच्या गुहेत येण्याची हिंमत करु नका अशा शब्दांमध्ये आव्हान दिलं होत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:00 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here