कष्टकरी महिला रिक्षा चालकांना हक्काचे रिक्षा स्टॅन्ड मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड निगडीत उभारले जाणार आहे. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे, यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने निगडी येथे देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड उभारले जाणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नावे या स्टॅन्ड चे उद्घाटन ६ फेब्रुवारी रोजी भक्ती शक्ती चौक निगडी येथे पार पडणार आहे.
