सावर्डे येथे मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर

0

चिपळूण : येथील ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने बुधवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे.
कॅन्सर तज्ञांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ऑन्को लाईफ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष उदय देशमुख आणि लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. इसहाक खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटर चिपळूणच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here