अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापसी आंदोलन

0

लांजा : महाराष्ट्र शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने तसेच मोबाईल ॲपमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेमुळे आवश्यक असलेली माहिती भरणे अवघड होत असल्याने मोबाइलचा काहीच उपयोग होत नसल्याने सोमवारी अंगणवाडी सेविकांना मोबाइल वापसी आंदोलन करत शासनाला मोबाइल परत केले आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकांना त्यांची ऑनलाइन माहिती व हजेरी देण्यासाठी मोबाइल प्रत्येक अंगणवाडी सेविकांना देण्यात आले होते. मात्र, मोबाइल सातत्याने बंद पडत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. माहिती भरण्यासाठी ॲपमध्ये इंग्रजी भाषा असल्याने माहिती भरताना अडचण निर्माण होते. ग्रामीण भागामध्ये मोबाइलला रेंज नसल्याने माहिती भरायची कशी, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना भेडसावत होता. सोमवारी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोबाइल वापसी आंदोलन करत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या टेबलावर मोबाइल ठेवून घोषणाबाजी केल्या. यावेळी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये माहिती भरताना अडचण निर्माण होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविणार आहोत. मोबाइल ट्रॅकरचे काम थांबणार असल्याने दररोजचे हजेरीचे कामही लागणार नाही. त्यामुळे पुढे काम करताना अडचण निर्माण होणार आहे.
-संपदा भागवत, बाल विकास प्रकल्प अधिकारी लांजा.

नादुरुत मोबाईलमुळे शासनाला माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत. या मोबाइलवर काम करणे कठीण आहे म्हणून आम्ही वारंवार शासनाला निवेदन देऊन नवीन मोबाइलची मागणी केलेली आहे. म्हणूनच आज आम्ही मोबाइल वापसी आंदोलन केले आहे. मोबाइलमुळे काम थांबणार असल्याने नवीन मोबाइल लवकर द्यावेत.
– स्वाती शेट्ये, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा, लांजा

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here