मुंबईतील डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असतं. कधी हिरवा पाऊस, नालातल्या घाणं पाणी तर आता चक्क गुलाबी रस्ता डोंबिवलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरण विभागाकडे बोट दाखवत हात झटकण्याचं काम केलं आहे. यावरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीकर प्रदूषणाच्या विळख्यात असताना मंत्र्यांनी जबाबदारी झटकणं हास्यास्पद आहे. आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका. प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू असा इशारा कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.
