जीवघेण्या मुंबईच्या गर्दीत आणखी एकाचा नाहक बळी

0

मुंबईची गर्दी निर्दयी आणि जीवघेणी ठरू शकते याचा अनुभव सकाळच्या वेळी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अनेकांना येतो. पण प्रत्यक्ष डोळ्यादेखत या गर्दीने आज एकाचा जीव घेतला आणि दोन जण रुग्णालयात मृत्यूशी झुंजत आहेत. खचाखच भरलेल्या लोकलमधून ठाण्याजवळ तिघे जण पडले. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हे तिघे जण चढले होते. कल्याणहून गाडी भरून आली होती. मुंब्रा स्थानकात प्रचंड गर्दी उसळली आणि मुंगीलाही जागा उरणार नाही अशी अवस्था झाली. दाराजवळची गर्दी अजिबात हलायला जागा नव्हती. त्यामुळे पुढच्या कळवा स्थानकात उतरणाऱ्यांना दारापाशी यायला अवसरच नव्हता. या गर्दीचा रेटा दारात उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर आला. दाराजवळ उभे असलेले तिघे जण या आतल्या गर्दीच्या रेट्याने खाली पडले. कळवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान रुळांवर पडल्याने त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. जखमींवर कळव्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत. सकाळी 10 नंतर खरं तर गर्दीचा ओघ कमी होतो. पण हा अपघात 10 नंतरच घडल्याचं समजतं.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here