मिरजोळे येथील माघी गणेशोत्सव मंडळ पाडावेवाडीतर्फे जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत रत्नागिरीच्या नाट्यशोध संस्थेने सादर केलेल्या ‘वन डे सेलिब्रेशन’ एकांकिकेने प्रथम, तर गणेशगुळेच्या चतुरंग प्रॉडक्शनच्या ‘तदैव लग्नम’ ने द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा दि. २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत झाली. स्पर्धेत बारा एकांकिका सहभागी झाल्या होत्या. मराठी रंगभूमीच्या ‘पाझर’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या एकांकिकेला आठ हजार, द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
